‘पद्मश्री’ सुलोचनाताई चव्हाण : लावणीच्या मळ्यातील गोड गळा
सुलोचनाताईंनी फडावरची लावणी माजघरात पोहोचवली. लावणीचं सौंदर्यस्थळ ओळखून, डोईवरचा पदर ढळू न देता लावणीला एक संस्कारक्षम बैठक दिली आणि लावणी जगभरात पोहोचवली. ताईंच्या गायिकीनं लोकांचं मनोरंजन तर केलंच, त्याबरोबर प्रबोधन, उदबोधनही केलं. या महान कलावतीकडे दातृत्वाची आणि दानत्वाची श्रीमंती होती. त्या नेहमी म्हणायच्या की, एक उत्तम कलावंत होण्यापेक्षा एक माणूस होणं खूप गरजेचं आहे........